Gallery

Life on campus

Functions, programmes, exhibitions and everyday moments: a glimpse of life across our two schools.

Events 18 October 2026

🌟 सामाजिक बांधिलकी – अंधनिधी संकलन उपक्रम

🌟 सेवेतून संस्कार, संस्कारांतून माणुसकी! 🌟 संस्कार भारती शिक्षण प्रसारक मंडळ, पर्यंती या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली श्री दर्याबा विद्यालय, पर्यंती येथे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविला जातो. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे अंधनिधी संकलनात सहभागी होऊन दृष्टिबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलतो. संकलित निधी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेकडे सुपूर्द केला जातो. हा उपक्रम केवळ निधी संकलन नसून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व, सामाजिक जाणीव आणि मानवतेची मूल्ये रुजवणारा संस्कारमय प्रवास आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक छोट्याशा योगदानातून समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि मदतीची भावना अधिक दृढ होते. 💐 विद्यार्थ्यांच्या मनात सेवेची ज्योत पेटवून, समाजाप्रती कर्तव्याची जाणीव निर्माण करत शिक्षणासोबत माणुसकीचे संस्कार घडविणे—हीच संस्कार भारती शिक्षण प्रसारक मंडळ, पर्यंती या संस्थेची अभिमानास्पद ओळख! 🌹

Activities 2 October 2026

🌿 सामाजिक बांधिलकी – वनराई बंधारा बांधकाम स्थळ : पिंपळदरा, दानवलेवाडी

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी पिंपळदरा येथे वनराई बंधारा बांधकामात सहभाग घेतला. यावेळी बंधाऱ्यासाठी आवश्यक दगड व वाळूची पोती रचून पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम करण्यात आले. या उपक्रमातून पावसाचे पाणी अडवून जमिनीत पाणी मुरवणे, जलसाठा वाढवणे आणि जलसंधारणाचे महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली. या सामाजिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सहकार्य आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजविण्यात आली. 🌱💧

Cultural 8 September 2026

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साक्षरता गीत सादरीकरण केले

Learning 1 September 2026

Digital Classroom

💻 डिजिटल क्लासरूम – आधुनिक शिक्षणाची नवी दिशा! 🌟 न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक सोपे, रंजक आणि प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी येथे डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. स्मार्ट स्क्रीन, डिजिटल सादरीकरणे आणि दृक्-श्राव्य माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना सर्व विषय सहज समजतात. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, जिज्ञासा आणि संकल्पनांची स्पष्ट समज वाढण्यास मदत होते. ✨ पारंपरिक शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, ज्ञानार्जनाचा आनंददायी आणि नाविन्यपूर्ण अनुभव देणारे डिजिटल क्लासरूम म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल! 📚💡

Cultural 15 August 2026

१५ ऑगस्ट बक्षीस वितरण आणि विद्यार्थ्यांची भाषणे

Cultural 15 August 2026

१५ ऑगस्ट बक्षीस वितरण आणि डिजिटल बोर्ड उद्घाटन

Cultural 24 July 2026

बाल दिंडी सोहळा

🌺 बाल दिंडी सोहळा – संस्कार, भक्ती आणि वारकरी परंपरेचा संगम! 🌺 श्री दर्याबा विद्यालय, पर्यंती विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेची ओळख निर्माण व्हावी, संतांच्या विचारांचे संस्कार रुजावेत आणि भक्तीभाव वाढावा, या उद्देशाने श्री दर्याबा विद्यालय, पर्यंती येथे दरवर्षी बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात विद्यार्थी प्रत्यक्ष दिंडीत सहभागी होऊन वारकऱ्यांचा उत्साह, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, समानता, सहकार्य आणि संस्कृतीविषयी आदर ही मूल्ये रुजवली जातात. 🙏 ज्ञानासोबत संस्कारांची शिदोरी देणारा आणि नव्या पिढीला वारकरी परंपरेशी जोडणारा हा बाल दिंडी सोहळा म्हणजे संस्कारमय शिक्षणाचा सुंदर उत्सव! 🙏

Learning 19 June 2026

Computer Lab

💻 कॉम्प्युटर लॅब – डिजिटल युगासाठी सक्षम विद्यार्थी! 🌟 न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी आजच्या डिजिटल युगात संगणक ज्ञान ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी येथे कॉम्प्युटर लॅबच्या माध्यमातून संगणकाचे मूलभूत ज्ञान व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. ⌨️ संगणक हाताळणी, टायपिंग आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात करताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व तंत्रज्ञानाची आवड निर्माण होते. हे ज्ञान भविष्यातील शिक्षण, विविध स्पर्धा परीक्षा आणि करिअरसाठी उपयुक्त ठरते.

Cultural 16 January 2026

वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम

🌟 वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम 🌟 श्री दर्याबा विद्यालय, पर्यंती विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवी दिशा देणारे व्यासपीठ म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम! 💐 या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि नृत्य, गायन, नाट्य अशा विविध कलांचे सुंदर दर्शन घडते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना उजाळा देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्री दर्याबा विद्यालय, पर्यंती येथे केले जाते. 🌸

Events 26 December 2025

शिक्षण परिषद न्यू इंग्लिश स्कूल दानवलेवाडी

Events 25 November 2025

शैक्षणिक सहल रायगड, कारला लेणी, मुरुड जंजिरा, एकवीरा

🏞️ शैक्षणिक सहल – ज्ञानासोबत आनंदाची सफर! 📚 न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी विद्यार्थ्यांना इतिहासाची प्रत्यक्ष अनुभूती देत ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी म्हणजे शैक्षणिक सहल! 🏰 रायगड, कार्ला लेणी, मुरुड-जंजिरा आणि एकवीरा देवी यांसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांच्या भेटीतून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, प्राचीन स्थापत्यकला आणि सांस्कृतिक वारसा जवळून अनुभवता येतो. या सहलीतून निरीक्षणशक्ती, जिज्ञासा, सहकार्याची भावना आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान निर्माण होतो. ✨ पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारी, आनंददायी आणि अविस्मरणीय ज्ञानयात्रा म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडीची शैक्षणिक सहल! ✨

Learning 15 October 2025

वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन – भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. न्यू इंग्लिश स्कूल, दानवलेवाडी येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानात भर पडावी आणि वाचन संस्कृती रुजावी, या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. 📖 “पुस्तके वाचा, ज्ञान वाढवा आणि उज्ज्वल भविष्य घडवा!” ✨

Nature 20 August 2025

वृक्षरोपण कार्यक्रम 2025

🌱 वृक्षारोपण कार्यक्रम २०२५ 🌳 न्यू इंग्लिश स्कूल दानवलेवाडी चे माजी विद्यार्थी श्री बाळासाहेब शिर सट तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी पुणे शहर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यालयास वृक्ष दान केले न्यू इंग्लिश स्कूल दानवलेवाडी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धन व हरित भविष्याच्या निर्मितीसाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. 🌿 वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनातून निसर्गाप्रती कृतज्ञता, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. 💚 🌳 सामाजिक बांधिलकीतून हरित भविष्याकडे वाटचाल!

Sports 10 January 2024

क्रीडा महोत्सव २०२३-२४

🏆 शालेय क्रीडा महोत्सव २०२३–२४ | श्री दऱ्याबा विद्यालय, पर्यंती मैदानी खेळ व विविध क्रीडा स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांच्यात जिद्द, शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्व आणि संघभावना रुजविण्याचा उपक्रम! 🏃‍♂️🌟 खेळातून शारीरिक व मानसिक सक्षमीकरण साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा प्रेरणादायी महोत्सव!

Admissions 2026-27

Give your child a head start.
Applications are now open.

Book a visit, meet our teachers, and see why families across the Maan region choose Sanskar Bharati Shikshan Prasarak Mandal.

Contact for Admissions

Visit us

Paryanti, Tal. Man, Dist. Satara, Maharashtra

Office hours

Mon to Sat, 10:00 AM to 4:45 PM